Breaking


मोठी बातमी : १३ वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये भारताला सुवर्णपदक, नीरज चोप्राची दमदार कामगिरी


टोकियो : भारताने आज एकूण दोन पदकं जिंकत उत्तम कामगिरी केली आहे. भालाफेक मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. 


 

भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत. २३ वर्षीय नीरज चोप्राने पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात ८६.६५ मीटर भाला फेकला होता. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकनंतर भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे तर दुसरीकडे प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनियाने देखील भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. बजरंगने कझाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव्हचा 8-0 ने पराभव केला.


१३ वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा