Breaking


जागतिक आदिवासी दिनी खडूच्या साहाय्याने अप्रतिम चित्र काढून आदिवासी कलात्मक संस्कृती जोपासलीकळवण (सुशिल कुवर) : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिम्मित देवळा एज्युकेशन सोसायटीचे कलाशिक्षक इंटरनॅशनल पुरस्कार विजेते, विविध बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर भारत पवार गाव इंशी कळवण यांनी जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे रंगीत खडूच्या साहाय्याने आखीव रेखीव पद्धतीने जगातील सुप्रसिद्ध वारली पैंटींग आणि जननायक बिरसा मुंडा यांचे चित्र काढून आदिवासी कलात्मक संस्कृती जोपासली. ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आणि जागतिक आदिवासी दिनानिम्मित सर्व आदिवासी क्रांतिवीरांना अभिवादन करून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही त्यांची प्रतिकृती व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, यानिमित्ताने त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा