Breaking
'पेसा पुरस्कार'साठी राज्यभरातून एकच प्रस्ताव, पुरस्कारासाठी पुढे न येणे हे कशाचे लक्षण - डॉ. कुंडलिक केदारी


पुणे : आदिवासी बहुल भागात पेसा ग्रामपंचायती घोषित झाल्या. पेसा ग्रामपंचायतीने पेसा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामसेवकाला बहुरंग संस्था पुणे यांच्या वतीने 'पेसा पुरस्कार' दिला जाणार होता. परंतु पेसा पुरस्कारासाठी राज्यातून फक्त एकच प्रस्ताव आल्याची माहिती बहुरंग संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी दिली. 


डॉ. केदारी म्हणाले, पुरस्कारासाठी पुढे न येणे हे कशाचे लक्षण समजावे. ग्राम सभा सकक्षम करून, पेसा आणि वनहक्क कायदा अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामसेवकांना सन २०१८ - २०१९ या वर्षाच्या कामकाजा हा पुरस्कार देण्यात येणार होता. १५ आगस्ट २०२१ ही प्रस्ताव पाठविण्याची शेवटची तारीख होती. पुरस्कार चे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह असे होते.


२१ एप्रिल २०१५ शासन निर्णय तथा मार्गदर्शक तत्वाप्रमाणे पेसा ग्रामपंचायतींना प्राप्त ५ टक्के अबंध निधीमधून शासन निर्णय यात नमुद केल्याप्रमाणे केलेल्या विकासकामांच्या दस्तऐवज चा प्रस्तावात समावेश होता. तसेच आदिवासी रुढी  परंपरा कला संस्कृती संवर्धन अंतर्गत दृकश्राव्य दस्त यांचा ऐवज पुरस्कारात विचार केला जाणार होता. परंतु राज्यातून पुरस्कारासाठी प्रस्तावच न येणे हा चर्चेचा विषय  ठरला आहे.


त्यामुळे पेसा ग्रामपंचायतींमध्ये 5 % अबंध निधीचा गैरवापर होतोय का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा