Breaking
उस्मानाबाद : शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्याची एआयएसएफची (AISF) मागणी


उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत वाईट असून महिलांसाठी तर स्वच्छतागृह अस्तित्वातच नाहीत हि गोष्ट अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) ने म्हटले आहे.


एआयएसएफने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, एका व्यक्तीला साधारणपणे दिवसभरातून ५-६ वेळा मुत्र विसर्जनासाठी जावे लागते परंतु सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना महिला कुचंबणा टाळण्यासाठी ते रोखून धरतात यामुळे महिलांना विविध त्रासातून जावे लागते. कित्येक महिलांना मूत्राशयाचा आणि किडनीचा त्रास याला तोंड द्यावे लागते याला फक्त महिलांना स्वच्छतागृहे उपलब्ध नसणे हेच एकमेव कारण असल्याचे एआयएसएफने म्हटले आहे.  


त्यामुळे येत्या महिनाभरात महिलांच्या स्वच्छतागृहाची उभारणी करा अन्यथा मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या दालनात आपल्याच शहरातील नगर परिषदेच्या उदासीनतेमुळे मोकाट फिरत असलेले डुक्कर कोंडून टाकू असा इशारा एआयएसएफने दिला आहे.


यावेळी राज्यसहसचिव सुजित चंदनशिवे, राज्य कौन्सिल सदस्य धीरज कठारे, शहर अध्यक्ष स्वप्नील घोडेराव, विश्वदीप खोसे, अश्वजित सोनवणे, सूर्याजी देशमुख, गणेश जाधवर, प्रशांत शिंदे, महावीर गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा