Breaking


पिंपरी चिंचवड : माजी महापौरांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात !


पिंपरी चिंचवड : चिखली प्रभाग क्र.2 चिखली प्राधिकरण, जाधववाडी, मोशीचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांच्या राहुलदादा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या टीमने  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, जयसिंगपूर, दानोली, नृसिंहवाडी, उदगाव, कोथळी या गावातील 450 पूरग्रस्त कुटुंबाना शिधा वाटप, नवीन साड्या, कपडे, पाण्याच्या बाटल्या आणि औषध गोळ्यांचे वितरण केले.आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधान सभा मतदार संघातील लोकप्रतिनिधींना तातडीने पूरग्रस्त भागात मदतीचे आवाहन केले होते.

माजी महापौर राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्त्या मंगल जाधव यांनी कोल्हापुर पूरग्रस्त गावातील गरीब लोकांना तातडीने मदतीची वाहने पाठवून दिलासा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा