Breaking


पिंपरी चिंचवड महापालिकेत मल्टी लुटा लुटीचा झिंग लपापा, सर्व विकास कामातील निविदांची चौकशी करण्याची माकपची मागणी


पिंपरी चिंचवड : महापालिकेत मल्टी लुटा लुटीचा झिंग लपापा सुरू आहे, सर्व विकास कामातील निविदांची चौकशी करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.


मनपाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये  कररूपाने  नागरिकांनी भरलेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निधी विकासकामांसाठी मिळालेला आहे, 7 हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. त्यातील 48 टक्के रक्कम स्थापत्य विभागासाठी आहे. त्यातूनही टक्केवारी लोकप्रतिनिधी मिळवत आहेत. कोरोना काळात मास्कखरेदीतून स्वतःचे आर्थिक आरोग्य सुधारून घेण्यात आले. गेल्या पाच वर्षात लोकप्रतिनिधी समृद्ध झाले आहेत. त्यांची समृद्धी म्हणजे नागरिकांची समृद्धी आणि शहर विकास असेच आता सर्वाना वाटत आहे.

कोरोनमुळे शाळा बंद आहेत, तरी सुद्धा शाळांसाठी स्वयंपाक घर उपकरणे खरेदी करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत. स्मार्ट सिटी, रस्ते, विकास, इत्यादी सर्व कामासाठी राज्य आणि केंद्र सरकारचा कोट्यवधी रुपयांचा निधी सत्ताधारी भाजपला मिळाला आहे. मनपा च्या प्रत्येक प्रभागात ठेकेदारांचे कल्याण करण्यासाठी नियोजनशून्य कामे सुरू आहेत, गरज नसतानाही रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जात आहे. जनआरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण यामध्ये कोणत्याही मूलभूत सुधारणा केल्या नाहीत. 2017 पासून पंचतारांकित विकासकामे आणि त्याचे ठेके देण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे. 

शहरातील विविध विकासकामे अर्धवट आहेत, नागरिक त्रास सहन करत आहेत. मनपा मध्ये मल्टी लुटालूटी चा झिंग लपापा सुरू आहे. इतिहासात प्रथमच धाड पडल्यामुळे शहराच्या नाव लौकिकाला काळिमा फासला गेला आहे. राज्य सरकारने मनपातील सर्व विकास कामाच्या निविदांची (TENDERS) चौकशी करावी अशी मागणी माकपने केली आहे.  

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शहर समितीचे कार्यालयीन सचिव क्रांतिकुमार कडुलकर यांनी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, अपर्णा दराडे, ख्वाजा जमखाने, सचिन देसाई, वीरभद्र स्वामी, सुकुमार पोन्नपन यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा