Breaking
पिंपरी चिंचवड : दिव्यांगांचे पोलिसांसोबत रक्षाबंधन !


पिंपरी चिंचवड
 : स्वर्गीय तुकाराम तनपुरे फाउंडेशन, दिव्यांग पोलीस मित्र संस्थेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी भोसरी पोलीस स्टेशन च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

संस्थेच्या मोशी विभाग प्रमुख स्मिता सस्ते म्हणाल्या की, आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र नागरिकांचे संरक्षण करत असतात. कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी कर्तव्य पार पाडले आहे. आणि पाडत पण आहेत. त्यांना सुट्टी नसते, ते आमचे खरे बंधू आहेत. त्यांना राखी बांधून आम्ही धन्य झालो आहोत.


यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पाटील, पुजारी, संतोष रत्नपारखी आणि इतर कर्मचाऱ्यांना आशा माने, संगीता सुपल, निर्मला हेगडे, अर्चना गाडे, सुवर्णा सस्ते, शकीला बागवान यांनी राख्या बांधल्या.


स्मिता सस्ते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, यावेळी नितीन सस्ते, सागर सुपल,विशाल काळे,अमृता वैद्य, शैलेंद्र रोकडे, प्रशांत पाचर्णे, गोपाळ सुनार, बबन हेगडे सह निगडी पोलीस स्टेशन शांतता समितीचे सदस्य वासुदेव काळसेकर कार्यक्रमास उपास्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा