Breaking


पिंपरी चिंचवड : विधवा महिलांना 25 हजार अनुदानाचे महिला संघटनेने केले स्वागत !


विशेष योजना राबवू - माई ढोरे


पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेच्या  नागरवस्ती विभागाने कोरोना मुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने विधवा झालेल्या महिलांना आत्मनिर्भर करण्याचे अनुदान 25 हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समिती आणि नागर वस्ती विभागाच्या या निर्णयाचे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड समितीने स्वागत केले आहे.

अध्यक्षा अपर्णा दराडे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील विधवा महिलांची वॉर्ड अधिकाऱ्यांनी माहिती गोळा करावी. अनेक पदवीधर सुशिक्षित विधवा महिलांना संसार चालवण्यासाठी कंपन्यांमध्ये कष्टाची प्रॉडक्शनची कामे करावी लागतात. विधवांना अनेक आस्थापनामध्ये काम मिळावे अशी आमची मागणी आहे. त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी मनपाच्या सरकारी, निमसरकारी सेवेत त्यांना नोकऱ्या द्याव्यात.

सरकारच्या समाज कल्याण विभागामार्फत त्यांना एक हजार रुपये दरमहा अनुदान दिले जाते मात्र तेही तुटपुंजे आहे. अनेक विधवा  महिलांना धुनीभांडी करून गुजराण करावी लागते. त्यांना पोळीभाजी केंद्र चालवण्यासाठी परवाना मिळत नाही. विधवा महिलांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, असेही दराडे म्हणाल्या.

प्रसिद्धी पत्रकावर अपर्णा दराडे, शैलजा कडूलकर, शेहनाज शेख, अंजली पुजारे, निर्मला येवले, रंजिता लाटकर, सुषमा इंगोले, योगिता कांबळे, मंगल डोळस, कविता मंदोधरे, आशा बर्डे, मनीषा सपकाळे यांच्या सह्या आहेत.

याबद्दल माहिती देताना मनपाचे समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड मनपाच्या रहिवासी असलेल्या आणि ज्याचे पतीचे कोरोनमुळे निधन झाले आहे. फक्त अशाच विधवा महिलांना ही अतिरिक्त 15 हजाराची अनुदानात वाढ करण्याचा मनपाची योजना आहे. 

महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे अनेक आस्थापनामध्ये कामकाजावर परिणाम झालेले आहेत. शहरातील विधवा महिलांना किमान रोजगार देण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. या कठीण काळात मनपाचा समाज विकास आणि नागरवस्ती विभाग आर्थिक  दुर्बल घटकांना कल्याणकारी योजनामार्फत मदत करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा