Breaking


धक्कादायक : प्रियसी म्हणाली तू मर जा..., तरुणाने फेसबुक लाईव्ह करत केली आत्महत्या


मुंबई : प्रेमात व्यक्ती काय करेल सांगता येत नाही, प्रेयसीने मला तुझी गरज नाही, तू मर जा… असे बोलताच एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.


अंकुश नामदेव पवार वय २७ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी असून गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी तो मुंबईत नोकरीच्या शोधात आला होता. एका खासगी रुग्णालयात वार्डबॉय म्हणून तो नोकरी करत होता. यावेळी त्याची एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचेही ठरवले होते.


या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत कल्याण पश्चिम परिसरातील राहत्या घरात जीवन यात्रा संपवली. माझं एक मुलीवर खूप प्रेम आहे. पण तिने वेळोवेळी माझा विश्वासघात केला. तिच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. इतकंच नाहीतर आपल्या भविष्यासाठी त्याने मुलीकडे सेविंग करण्यासाठी काही पैसेही दिले असल्याचं त्यानी म्हटलं आहे. मात्र, त्या तरुणीने आपली फसवणूक करून धोका दिल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असल्याचे त्याने आपल्या फेसबुक लाईव्ह म्हटले आहे.


या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिस तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा