Breaking
नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध, राजकीय सूड बुद्धीने केलेली कारवाई - नामदेव ढाके


पिंपरी चिंचवड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा भाजप पिंपरी चिंचवड शहर समितीने निषेध केला आहे. भाजपच्या कार्यालयासमोर शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर उषाताई उर्फ माई ढोरे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, विजू फुगे, मोरेश्वर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.


सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके म्हणाले, महाआघाडी सरकारने जनतेच्या कोणत्याही आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजना आणि भाजप कार्यकर्त्यांचे सामाजिक योगदान यामुळे केंद्रातील भाजप सरकारची लोकप्रियता सतत वृद्धिंगत होत आहे.


विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला बदनाम करण्याची मोहीम राबवली जात आहेत. राज्यातील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्यात अनेक प्रमुख नेत्यावर सूड बुद्धीने  पोलिसी कारवाया होत आहेत. नारायण राणे हे लढाऊ केंद्रीय मंत्री आहेत. मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातील पिंपरी चिंचवड सारख्या महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. याचा धसका घेऊन पोलिसांमार्फत  नारायण राणे यांना अटक केली आहे. या अटकेचा आम्ही निषेध करतो. असे सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्यानी कोरोनकाळात घरोघरी जाऊन जनतेला मदत केली आहे. पूरग्रस्त कोकण, सांगली, कोल्हापूर भागात मदतीसाठी आमचे कार्यकर्ते धावून गेलेले आहेत. महाआघाडी सरकारने सूडबुद्धीने कारवाया करू नयेत, असेही ते म्हणाले.


या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, अशा निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी रवी जांभुळकर, दिनेश यादव, राजू दुर्गे, उत्तम केंदळे, वैशाली खाडे, बाबू नायर, संकेत चोंधे आणि सर्व पदाधिकारी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा