Breaking
पुणे : आशाताई बुचके यांचा जुन्नर शहर भाजप तर्फे सत्कार समारंभ संपन्न


जुन्नर / रफिक शेख : जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर प्रथम जुन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार समारंभ कोंडाजीबाबा ढेरे आश्रम येथे संपन्न झाला.


आशाताई बुचके यांनी काही दिवसा पूर्वी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केले होते.


जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टीला नवसंजीवनी मिळेल अशी आशा "आशाताई बुचके" यांच्या प्रवेशाने निर्माण झाली आहे. २०२४ चा जुन्नर चा आमदार भाजपाचा असेल, असा नारा देत भाजप कामाला लागले आहे.


जुन्नर शहर भारतीय जनता पक्षाचे चे वतीने आयोजित सत्कार समारंभात जुन्नर तालुका निरिक्षक अविनाश बवरे, जिल्हा उपाध्यक्ष घोलप, तालुका अध्यक्ष संतोष तांबे, सादिक शेख, सुनील शहा व भाजप आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा