Breaking


पुणे : घरकामगार संघटनेची कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने


पुणे : पुणे जिल्हा घरकामगार संघटना, सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन्स (CITU) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या पिंपरी चिंचवड, पुणे शहरातील महिला कामगारांसह कंत्राटी कामगारांनी ऑगस्ट क्रांतिदिनी वाकडेवाडी शिवाजीनगर येथे विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने झाली. या आंदोलनात चिंचवड, चिखली, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी येथील बहुसंख्य घरेलू महिला कामगार सहभागी होत्या.


"या" मागण्या करण्यात आल्या :

- शहरातील घर कामगार नोंदणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नोंदणी कक्ष उभारा.

- घरगुती गॅस सिलिंडर वरील अनुदान त्वरित सुरू करा.

- विधवा, परितक्त्या महिलांना विशेष अनुदान द्या.

- असंघटित कामगारांना किमान वेतन २१ हजार रुपये करा.

- सर्व घरेलू कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करा.

- आशा/अंगणवाडी कर्मचारी, कंत्राटी नर्सेस, वार्डबॉय यांना सरकारी नोकरचा दर्जा द्या.

- रेशनवर तांदूळ, गहू सह खाद्यतेल, साखर, गूळ, शेंगदाणे, मीठ, मसाला सहित सर्व जीवनावश्यक वस्तू द्या.

- वन नेशन वन रेशनकार्ड योजनेची सुलभ अंमलबजावणी करा.

- नवीन कामगार कायदे रद्द करून पूर्वीचे किमान कल्याणकारी कायदे प्रस्थापित करा.

- आरोग्य सेवेचे सार्वत्रिकण, शहरी/ग्रामीण आरोग्य सेवा रुग्णालये सुसज्ज करा.

- महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढवा.


या आंदोलनाचे नेतृत्व किरण मोघे, अपर्णा दराडे यांनी केले. सरस्वती भांदीर्गे, शेहनाज शेख, हिराबाई घोगे, सुवर्णा बनसोडे, ज्योती सूर्यवंशी, मंगल डोळस, अनिता पवार, महानंदा जोगदंड, जया सूर्यवंशी, जया चव्हाण, मंगला कानोडे, जनाबाई खारवेर, सरस्वती कर्मा, वडकी जयस्वाल, गायत्री ओहोळ, कल्याणी गोरे, पपिता लांडगे, जया चव्हाण या प्रमुख महिला आंदोलनात सहभागी होत्या. तसेच कामगार नेते अजित अभ्यंकर, गणेश दराडे, वसंत पवार यांनी या आंदोलनास पाठिंबा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा