Breaking


पुणे : पूरग्रस्तांसाठी दिघी विकास मंच्याचा मदतीचा हात ..!


दिघी : कोकणात अतिवृष्टी झाल्याने, चिपळून, महाड, मधील अनेक गावांत पाणी शिरल्यामुळे या पूरामध्ये असंख्य नागरिकांचे संसार वाहून गेले. या संकटामुळे चिपळून येथील शंकरवाडी, अडरे, या गावातील रहिवासांना अन्नदान्य, महिलानां वस्त्र, जीवनावश्यक वस्तू , साहित्य स्वरुपात मदत करण्यात आली.तसेच अडरे ग्रामपंचायतीच्या संरपच सोनाली पिपंरे यांनी मदत कार्याचे आभार मानत प्रमाणत्रक दिले.


यावेळी दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, सुनिल काकडे, दत्ता घुले, धनजंय खाडे, किशोर गुरव, मनोज नांगरे, आकाश शिंदे, दत्ता माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा