Breaking


पुणे : घरफोडी चोरी करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार गुन्हे शाखेकडून जेरबंद !


पुणे / आनंद कांबळे : पुणे शहरामध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार वाढ होत असल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारा वर पाळत ठेवण्याचे वरिष्ठांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. 15 ऑगस्ट 2021 रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना बातमीदाराकडून गुन्हेगाराची माहिती मिळाली.


बातमीदाराने सांगितले की, पोलीस अभिलेखा वरील घरफोडी चोरी करणारा इसम युवराज अर्जुन ढोणे व अविनाश अर्जुन ढोणे हे कात्रज तलाव, भारती विद्यापीठ, पुणे या ठिकाणी येणार असून याकडे प्लॅटिना गाडी आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जाऊन गुप्तपणे पाहणी करत असताना मिळालेल्या वर्णनाचे इसम कात्रज तलाव समोर प्लॅटिना गाडीवर बसलेले दिसले. त्याना ताब्यात घेऊन नाव, पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे युवराज अर्जुन डोणे ( वय 26 रा. मु. पो.मिरजगाव कवडेवस्ती, ता.कर्जत, जि. अहमदनगर ) अविनाश अर्जुन डोणे, असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे सदर गाडीचे कागदपत्र मागितली असता त्याच्याकडे सदर गाडीचे कागदपत्र नव्हते. त्याच्याबाबत संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यास कार्यालयात आणून त्यांचे कडे अधिक चोकशी केला असता त्याने गाडी चोरी केले बाबत सांगितले. 

त्यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांची पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आली. पोलीस कस्टडीत असताना त्याच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी पुणे शहर व ग्रामीण परिसरात घरफोडी चोरीचे अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्यांचेकडून खालील प्रमाणे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
                                      
आरोपींना अटक करून त्यांचेकडून एकूण एकूण 9 लाख 40 हजार 050 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे चे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे चे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे 1 चे सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चे क्रांतिकुमार पाटील , तसेच युनिट 2 यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स.पो.नि. वैशाली भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार आंब्रे, पोलीस अंमलदार किशोर वग्गु, संजय जाधव, उत्तम तारू, चंद्रकांत महाजन, गजानन सोनुने, निखिल जाधव, कादिर शेख, मितेश चोरमोले, समीर पटेल, गोपाल मदने यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा