Breaking


पुणे : दुचाकी स्वारा सहीत गाडी टो व्हॅन मध्ये, नागरिक संतप्त


पुणे : पुण्यातील नाना पेठेत गुरुवारी सायंकाळी पावणे पाचच्या एका दुचाकी स्वारास पुणे वाहतूक पोलिसांनी टो व्हॅन मध्ये उचलून टाकले आहे.


साहेब, माझी गाडी नो-पार्किंगमध्ये नाही, मी दोन मिनिटांसाठी रस्त्यालगत गाडीवरच थांबलेलो आहे, मी गाडी पार्किंग केलेलीच नाही, मी लगेचच येथून जातो, कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असतानाही पोलिसांनी चालकासह टोईंग केले. सध्या
वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांना अडवण्याचे प्रकार खूप वाढलेले आहेत. गाड्या उचलण्यासाठी खाजगी कंत्राटे दिली आहेत.

वाहतूक पोलिस पुणे पिंपरी चिंचवड शहरात गर्दीच्या ठिकाणी चौका चौकामध्ये टो व्हॅन द्वारे कारवाई करतात. त्यांची कारवाई मनमानी आणि पैसे खाण्यासाठीच असते, असे आरोप नागरिक करत आहेत. पोलिसांच्या या प्रकारामुळे वाहतूक पोलीस आणि नागरिक याच्या मारामाऱ्या देखील झालेल्या आहेत. वाहतूक पोलीस पैसे घेतानाचे व्हीडिओ व्हायरल झालेले आहेत.

पुण्यातील आजची कारवाई अपमान आणि तिरस्कार करण्यासारखी आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा