Breakingपुणे : मांजरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा !


मांजरी बु : मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी दिली.


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी जि.प.सदस्य दिलीप घुले, नंदकुमार घुले, रमेश घुले, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा