Breaking
पूर्णा : डीवायएफआय कडून रस्त्यासंदर्भात तीन विभागांना निवेदन


पूर्णा : डीवायएफआय कडून पूर्णा येथील हिंगोली गेटकडे असणाऱ्या भुयारी रस्त्याची जी दूरावस्था झालेली आहे त्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका व रेल्वे प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.


पूर्णेतील भुयारी मार्गालगतचा रस्ता मागिल कित्येक माहिन्यांपासून दयनीय अवस्थेत आहे. कित्येक वेळा निवेदने देऊन, वर्तमानपत्रात बातम्या देऊन सुद्धा त्याकडे दूर्लक्ष केले जात आहे. त्या रस्त्यावर कित्येक मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. मागील आठवड्यातच एक रिक्षासुद्धा उलटला होता, सुदैवाने त्यात कुठलीही हानी झाली नाही. असे बरेच छोटेमोठे अपघात होत आहेत. या खड्डयांशिवाय त्या रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी सुद्धा साचत आहे. या सर्व समस्यांमुळे पूर्णेतील व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून डीवायएफआय या युवक संघटनेकडून वर उल्लेखलेल्या तिन्ही विभागांना निवेदन देऊन पाच दिवसाच्या आत या समस्येवर उपाय करण्याची विनंती केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.


निवेदनावर नसीर शेख, अजय खंदारे, सचिन नरनवरे व अमन जोंधळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा