Breaking


खेड सेझ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे सरकारला स्मरण पत्र


पुणे : खेड सेझ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीचे आयोजित करून प्रश्न त्वरित सोडविण्यास यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांना स्मरण पत्र पाठवले आहे.


पत्रात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील खेड सेझ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून प्रलंबित असलेला 15 % टक्के परतावा. प्रश्न अत्यंत गंभीर असून यासंदर्भात शेतकऱ्यांनी आपणाकडे संयुक्त बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा बाबतीत दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी व यापूर्वीही वेळोवेळी निवेदन देऊन विनंती केलेली आहे.

याशिवाय वेगवेगळ्या संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन या प्रश्नासंदर्भात प्रश्न त्वरित सोडविण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात बाबत निवेदने पाठविली आहेत.
 
प्रादेशिक अधिकारी, एम.आय.डी.सी. पुणे यांच्याकडून दिनांक १४ जून २०२१रोजी मुख्यमंत्री कार्यालयास बैठक आयोजना संदर्भात कळविण्यात आले आहे. आपण आंदोलन करू नये अशा स्वरूपाचे पत्र मिळाले आहे.

परंतु अद्याप पर्यंत बैठकीचे आयोजन होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून जर संयुक्त बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावला नाही. व लवकरात लवकर बैठकीचे आयोजन केले नाही .तर विविध संघटनांच्या माध्यमातून व शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र जनआंदोलन  केव्हाही / कधीही सुरू करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. सेझ बाधित शेतकऱ्यांच्या पुढे आंदोलन करणे शिवाय पर्याय उरले नाहीत.

तरी शेतकऱ्यांच्या वतीने आपणास या स्मरण पत्राद्वारे पुन:श्च विनंती, करण्यात येते की पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठकीचे आयोजन त्वरित करण्यात यावे.व हा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा