Breaking


आयटीआयच्या प्रश्नांना घेऊन माहूर येथे एसएफआयचे आंदोलन


माहूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) माहूर तालुका कमिटीच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI) च्या प्रश्नांना घेऊन आंबेडकर चौक माहूर येथे आंदोलन करण्यात आले.


आंदोलनाचे नेतृत्व एसएफआयचे नांदेड जिल्हा सहसचिव प्रफुल्ल कउडकर यांनी केले. या आंदोलनात आयटीआयच्या प्रमुख मागण्या मध्ये आयटीआयच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात, माहूर आयटीआयला परीक्षेचे केंद्र बनवा, माहूर आयटीआयला कॉम्पुटर लॅब द्या, आयटीआय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करा, आयटीआयमध्ये विद्यार्थी निवडणुका घ्या आदी  मागण्या केंद्रीय उद्योग मंत्री आणि NCVT-National Council Of Vocational Training बोर्ड दिल्लीला तहसीलदारामार्फत निवेदन पाठवण्यात आले.


यावेळी आंदोलनाला पाठिंबा आंबेडकरी चळवळीचे नेते पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे व पत्रकार जयकुमार अडकीने यांनी दिला.


यावेळी आंदोलनाला एसएफआयचे तालुका अध्यक्ष विशाल नरवाडे, तुषार कांबळे, साक्षी बोळे, लता कलेकर, श्रद्धा ढगे, दिशा पंडागळे, निशा मारबते, गौतम खडसे, प्रथमेश गायकवाड, साईनाथ शिंदे, आदेश आडे, अक्षय करपते, आदेश भगत, बादल पाटील, संतोष कागणे, रोशन पवार, सोहेल पठाण, धीरज जाधव, मयुरेश संगमावर, पवार रोशन, नागेश आठवले, तेजस चिरडे, लक्ष्मण हिंगाडे, प्रकाश कोरमवाड, प्रतीक गावंडे, योगेश आडे, देविदास चव्हाण, अरुण पंदिलवाड, रुपेश शेवाळे, गोकुळ जवादे, हर्षद भवरे आणि नितीन पवार तसेच सर्व आयटीआयचे विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा