BreakingSFI तर्फे 75 व्या स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा !


सोलापूर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटी च्यावतीने आज एसएफआय कार्यालय समाजमंदिर, दत्त नगर येथे 75 व्या स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.


यावेळी नदाफ सर यांच्या हस्ते शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार हर्पण करण्यात आले. एसएफआय चे जिल्हाध्यक्ष राहुल जाधव यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकावण्यात आला. एसएफआय चे माजी अध्यक्ष अनिल चौगुले, किशोर झेंडेकर, एसएफआयचे जिल्हा उपाध्यक्ष पूजा कांबळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत. सूत्रसंचालन
एसएफआयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी यांनी केले.

यावेळी एएफआय माजी सचिव मीरा कांबळे, सहसचिव शामसुंदर आडम, सचिव सदस्य सदस्य राहुल भैसे, जिल्हा कमिटी सदस्य विजय साबळे, प्रशांत आडम, अश्विनी मामड्याल, गणेश भोईटे, लक्ष्मी रच्चा, रोहित सावळगी, तौसीद कोरबू, श्रुतिका बल्ला, रुपाली झेंडेकर, रोशन सिरसट, लक्ष्मीकांत कोंडला, प्रकाश म्हैत्रे इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा