Breaking
दामाजी नगरच्या सरपंच सुवर्णा वडतिले यांचा साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार


सांगोला (अतुल फसाले) : दामाजीनगर ता. मंगळवेढा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस व बबनराव अवताडे गट पुरस्कृत सुवर्णा वडतीले यांची निवड झाली. नवनियुक्त सरपंच सुवर्णा वडतीले यांचा शनिवार सांगोला येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, राष्ट्रवादीचे सांगोला शहर अध्यक्ष तानाजी पाटील, उपनगराध्यक्ष शिवाजी बनकर, मंगळवेढ्याचे युवा नेते भारत बेदरे, पंचायत समिती सदस्य संजय पवार, सुशील अवताडे, दामाजीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय जगताप, सोपान चव्हाण, ॲड. दत्तात्रय तोडकरी, बसवेश्वर माळी, दिलीप उगाडे, जमीर सुतार व आप्पा वडतीले आदींसह मान्यवर उपस्थित होते.


यावेळी नूतन सरपंच सुवर्णा वडतीले यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आगामी काळात दामाजीनगर गावाच्या सर्वांगीण विकासात नेहमीच सहकार्याची भूमिका राहील असे अभिवचनही शेवटी दिपक साळुंखे पाटील नूतन सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा