Breaking
सुरेशकुमार पंधरे यांची बिरसा फायटर्स विदर्भ प्रमुख आणि अध्यक्षपदी निवड


गोंदिया : सुरेशकुमार पंधरे यांची बिरसा फायटर्स विदर्भ प्रमुख आणि अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली (दि. 24 ऑगस्ट) ऑनलाईन सभेत राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष यांची पदी निवड करण्यात आली.   


ऑनलाईन, व्हाट्सएप व फोनद्वारे चर्चेत राज्याच्या मुख्य पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला. सुरेशकुमार पंधरे सामाजिक कार्यकर्ते असून अनेक संघटनांत सामाजिक काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. ते अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ते निसर्ग लेखक सुद्धा आहेत. त्याचबरोबर देशोन्नती, आदिवासी दहाड, आदिवासी क्रांती मराठी न्यूज डिजिटल पेपर इत्यादी वृत्तपत्राचे पत्रकार आहेत. राष्ट्रीय विश्वगामी विदर्भ पत्रकार अंतर्गत राष्ट्रीय वि.ह्युमन राईट्स संघ महाराष्ट्र प्रदेशचे प्रांताध्यक्ष व समन्वयक सरपंच परिषद मुंबई इत्यादी संघटनांचे काम पाहतात. त्यांनी बिरसा फायटर्स संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.


बिरसा फायटर्स संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या विकासासाठी खूप काही कामे करायची आहेत, फक्त सामाजिक कामावरच भर आपल्याला द्यायची आहे. माझ्या सोबत विदर्भातील असंख्य समाजबांधव बिरसा फायटर्समध्ये काम करण्यास आले आहेत. विदर्भ विभागात संघटना वाढविण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन. लवकरच तालुका व जिल्हा शाखांचा विस्तार करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा फायटर्स सुरेशकुमार पंधरे यांनी व्यक्त केली आहे.


सुरेश कुमार पंधरे यांची विदर्भ प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा फायटर्स पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष राजेश धुर्वे, महासचिव राजेंद्र पाडवी, महानिरीक्षक केशव पवार, कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी, राज्य प्रवक्ता रोहित पावरा, कोषाध्यक्ष दादाजी बागूल, हसन तडवी प्रसिद्धी प्रमुख, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, साहेबराव कोकणी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी, संतोष वळवी शहादा तालुका अध्यक्ष, प्रितेश पावरा नाशिक विभाग प्रसिद्ध प्रमुख, गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नंदुरबार, जितेंद्र पावरा युवा जिल्हाध्यक्ष धुळे, राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा