Breaking
शिवसेना उपनेते आढळराव पाटील यांनी दंड थोपटले, बैलगाडा शर्यत सुरू करा अन्यथा...


मंचर / रवींद्र कोल्हे : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या 'बैलगाडा शर्यत' येत्या पंधरा दिवसात चालू करा अन्यथा मी आंबेगाव तालुक्यात, त्याचप्रमाणे संपूर्ण पुणे जिल्ह्यात 'बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारच', भले माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी पर्वा नाही. असे सांगून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एकप्रकारे आढळराव यांनी चॅलेंज केले ? मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


बैलगाडा शर्यती बाबत काही जण राजकारण करीत असल्याची टीका करून ते म्हणाले की, मी माझ्या मतावर ठाम आहे. माझ्याकडे पंधरा दिवसांपूर्वी बैलगाडा मालक मोठ्या संख्येने आले होते. त्यांना मी स्पष्ट सांगितले की, हा प्रश्न सोडवायचा असेल तर प्रत्येकाने राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र एका व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. प्रत्येक जण आपापल्या श्रेयासाठी बैलगाडा दुसऱ्या बाजूला वळवत आहे. गाडा वाळवून चालणार नाही तर तो सरळ रेषेत गेला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

खासदार डॉ.अमोल कोल्हे, गृहमंत्री वळसे पाटील असतील किंवा संगळ्यांच्या बरोबर यायला मी तयार आहे. मी राजकीय म्हणून बोलत नाही आणि हेच मी वळसे पाटील यांना खाजगीत बोलतांना सांगितले आहे. की शर्यती बाबत काय स्टेटस आहे ? लीगल परिस्थिती काय आहे ? बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी काय काय करायला लागेल ते सारं बैलगाडा मालकांना व्यवस्थित संबोधन केले की वस्तुस्थिती काय आहे हे सांगणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजही मी मतावर ठाम आहे ? मी माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यत चालू करणार म्हणजे करणारच कायदेशीर काय केसेस होतील त्याचा मी विचार करत नाही. बैलगाडा शर्यती आयोजित केल्यावर गृहमंत्री वळसे पाटील नक्कीच आमंत्रण दिले जाईल. एक दोन दिवसात मी पुन्हा येणार आहे.प्रत्येक तालुक्यातील बैलगाडा मालक,शेतकऱ्यांकडे जाणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात, जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणात मेळावे घेऊन आंदोलनाची दिशा निश्चित करणार असल्याची माहिती त्यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

सगळीकडे म्हटले जात आहे. सर्व पक्ष एकत्र यायला तयार आहे मात्र ओझर येथे बैलगाडा मालकांची बैठक घेण्यात आली. येथे फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते. मला बोलविण्याचे राजकारण केले. माझा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने त्या बैठकीला मला उपस्थित राहु शकलो नाही. 'खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी फोनवर संपर्क साधून निमंत्रण दिले तरी आढळराव उपस्थित राहू शकले नाही. असा व्हिडिओ तुम्ही सर्वत्र माध्यमांवर प्रसारित केला. याचा अर्थ तुम्ही राजकारण करत आहे अशा परखड शब्दात खासदार कोल्हे यांचेवर आढळराव पाटील यांनी टीका केली. 

या बैठकीसाठी मी सांगितले होते की, सर्वात पहिले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची तारीख घ्या त्यांच्याबरोबर सर्वजण एकत्र आले तर नक्कीच यातून मार्ग निघू शकेल. सर्व आमदारांनी आपापल्या परीने आपली भूमिका मांडणे योग्य नाही, सर्वांनी एकत्र आले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा