Breaking
सोलापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड शाहीर अमर शेख यांना अभिवादन !


बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 वार रविवार रोजी कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या बार्शी कोर्टा समोरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी अमर शेख यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.


यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड प्रवीण मस्तुद, कॉम्रेड अनिरुद्ध नखाते, कॉम्रेड बालाजी शितोळे, कॉम्रेड भारत भोसले, कॉम्रेड किसन मुळे, कॉम्रेड विनोद बारसकर,  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा