Breaking
दुगाव येथे बँक व्यवस्थापकाला प्रहार शेतकरी संघटनेचा दणकाचांदवड (सुनिल सोनवणे) : स्टेट बँक दुगाव शाखेत पिक कर्जाच्या 200 फाईल पडून आहेत. स्थानिक शेतकऱ्यांची या संदर्भात प्रहारकडे तक्रार आली होती. सर्व कागदपत्रांची पुर्तता करून सुध्दा या शाखेतील मॅनेजरने शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली आणि जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पिक कर्जापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला होता.


आज प्रहारने अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच येणाऱ्या आठ दिवसात सदर प्रकरणे निकाली काढले नाही तर या शाखे विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा पण दिला. या संदर्भातील लेखी देखील घेण्यात आले.


यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राम बोरसे, रूग्ण सेवक रेवन गांगुर्ड, तालुका संघटक संदिप जाधव तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा