Breaking
डॉ. दाभोळकरांच्या स्मृतिदिनानिमित्त DYFI कडून मुखमंत्र्यांना निवेदनपूर्णा : "डीवायएफआय" कडून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पूर्णेच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.


डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्रात 1989 साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करून महाराष्ट्राला एक वैज्ञानिक व विवेकी विचार दिला. समाजातील अंधश्रद्धा विरोधात त्यांनी मोठी चळवळ उभी केली मात्र त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या करण्यात आली. मागील आठ वर्षांपासून येथील राजकीय व्यवस्था व पोलीस प्रशासन त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेत दिवसेंदिवस त्यांच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. त्याचाच भाग म्हणून आणि डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडून कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठीचे निवेदन "डीवायएफआय" या संघटनेकडून पूर्णेच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. 


निवेदनावर नसीर शेख, अमन जोंधळे, अजय खंदारे, जय एंगडे, सचिन नरनवरे आणि तुषार मोगले आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा