Breaking


सांगोल्यातील वीज तोडणी थांबण्याची शेकापची मागणी


सांगोला : सध्या सांगोला तालुक्यातील विविध गावात शेतीपंपाची वीज तोडणी सुरू आहे. आज शेतकरी अडचणीत आहे, डाळिंबावरील तेल्या रोग, दुधाचे भाव कमी, इतर शेतमालाला दर कमी आहेत. या सर्व आर्थिक अडचणी मध्ये असताना कोरोनाचे संकट जात नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण तोडलेले वीज पुरवठा सुरळीत करावा व शेतकऱ्यांचे त्यांच्या कडून विविध टप्यात वीज बिल वसूल करावे अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.


यावेळी चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, गिरीश गगभडे, दीपक गोडसे, धनंजय मेटकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा