Breaking


जुन्नर तालुका महसूल कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन


जुन्नर : जुन्नर तालुका महसूल कर्मचारी कोतवाल संघटना यांच्या वतीने दि. ९ ऑगस्ट रोजी  निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे व महसूल नायब तहसीलदार शांताराम किर्वे यांना निवेदन हे देण्यात आले. 


महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने दि. ३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाला जुन्नर तालुका कोतवाल संघटनेने पाठिंबा दिला आहे. 


कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्याबाबत तसेच चतुर्थ श्रेणीची शासन स्तरावर कारवाई पूर्ण होईपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम , समान वेतन या धर्तीवर सरसकट १५००० रु वेतन देण्यात यावे, कोतवाल यांना तलाठी, महसूल सहाय्यक व तत्सम पदासाठी ५० % आरक्षण मंजूर करण्यात यावे, शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून भरण्यात याव्यात, कोरोनाने मयत वारसास अनुकंपा तत्वावर सेवेत समावेश करावे, सेवानिवृत्तीनंतर कोतवालास कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्याकारणाने सेवानिवृत्त कोतवालास १० लाख रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा. व राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करावी, तसेच कोतवाल संवर्गाकरिता दि.६ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयाबाबत पत्र क्रमांक (संकीर्ण - २०१९ पत्र क्र.११२ ई - १० ) नुसार देण्यात आलेल्या नागपूर मार्गदर्शनामुळे शासन निर्णयाप्रमाणे पात्र असूनही कोतवाल यांना वेतन वाढ मिळत नाही. सदर मार्गदर्शन रद्द करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.


कोतवालांच्या या मागण्या १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटना आंदोलन करणार इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी जुन्नर तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष लुमाजी घोडे, सचिव किरण म्हसकर, महिला प्रतिनिधी रेखा मरभळ, आक्काबाई दिघे, शैलेश कुऱ्हाडे, मारुती भालेराव, काशिनाथ भांगे, तानाजी सुपे, अनिल शिंदे, विशाल वायळ, रोहिदास मुकणे, विश्वास रावते, शामकांत वाव्हळ, नितीन लोहटे, अरुण धोत्रे, शंकर हगवणे आदी कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा