Breaking
सिटूच्या लढ्याला यश ! आशाना 1500 रुपये व गटप्रवर्तकना 1700 रुपये मानधन वाढ !


सिंधुदुर्ग
आशाना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या दरमहा मोबदल्यात एक हजार रुपये तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

केळी खाताना कोणती काळजी घ्यावी ? वाचा सविस्तर


राज्य आशा व गटप्रवर्तक समन्वय समिती व सिटूच्या नेतृत्त्वाखाली आशा व गटप्रवर्तक यांच्या न्याय मागण्यासाठी 15 ते 23 जून 2021 कालावधीत बेमुदत काम बंद आंदोलन केले होते. तसेच सिंधुदूर्गसह महाराष्ट्रतील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयवर निदर्शने केली होती. त्यावेळी राज्य सरकारने आशा व गटप्रवर्तक यांना 1500 रुपये व 1700 रुपये मानधन वाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण त्याबाबतचा शासन आदेश केला नसल्याने पुन्हा सिटूच्या नेतृत्त्वाखाली 3 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालय येथे निदर्शने केली होती. तसेच 9 ऑगस्ट 2021 रोजी रवळनाथ मंदिर ओरस येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. आजच्या शासन निर्णयामुळे सिटूच्या लढ्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या जिल्हा सचिव विजयाराणी पाटील यांनी दिली आहे.


तसेच कोरोना महामारी सुरु असेपर्यंत आशा व गटप्रर्वतक यांना दरमहा पाचशे रुपये कोविड भत्ता राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रस्तावित वाढ जुलै 2021 या महिन्यापासून देण्यात येईल. यासाठी होणाऱ्या अंदाजे 135 कोटी 60 लाख रुपयांच्या वार्षिक तरतुदीस मान्यता देण्यात आली.


सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा