Breaking
सुरगाणा : माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी विभागीय चौकशी समितीला सुनावले खडेबोल


सुरगाणा / पंडीत भोगे : माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी विभागीय चौकशी समितीला खडे बोल सुनावले. आपण आदिवासी बांधवाना घरातून जमीन देत नाही जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.आज (दि.१९) सुरगाणा येथे भवाडा गटातील २०० अपात्र प्लॉट धारकांची विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत सुनावणी ठेवण्यात आली होती. या प्रसंगी भवाडा गटातील सुनावणी असलेल्या सर्व प्लॉट धारकांना सुरगाणा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात जमा होण्यास सांगितले होते. त्यावेळी माजी आमदर जे. पी. गावित सो. उपसभापती इंद्रजित गावित, तालुका सेक्रेटरी सुभाष चौधरी तसेच माजी सभापती मंदाकिनी भोये यांनी त्यांना प्रथम सुनावणी संदर्भात मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व प्लॉट धारकांच्या वतीने माजी सभापती मंदाकिनी भोये यांची सुनावणी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. 

त्या प्रसंगी २०० प्लॉट धारकांची सुनावणी संपेपर्यंत स्वतः उपस्थित राहून प्लॉट धारकांकडे असलेले पुरावे कमिटीला समजावून सांगितले. तसेच त्यांनी सांगितले की, आपल्याकडे सुनावणीसाठी जे आदिवासी बांधव आलेले आहेत ते अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जीवन जगत असून बाहेर कामावर जाऊन आपली उपजीविका करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वन दाव्यावर निर्णय घेण्यापूर्वी आपल्याकडून विचारपूर्वक निर्णय घेण्यात यावा. 


केवळ फॉरेस्टने केलेल्या दंडाची पावती ह्या एकाच पुराव्यावर अवलंबून न राहता आपल्याला १२ पुराव्यानं पैकी कोणतेही २ पुरावे असतील तरी दावा पात्र करण्यास सांगितले आहे हे लक्षात घ्या. वन दावा धारकाकडे पुरावा नसेल तर जागेवर जाऊन स्थळ पाहणी करा. आपण त्यांना घरातून जमीन देत नाही तो आदिवासी बांधवांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे त्यामुळे सकोल चौकशी करून मगच योग्य तो निर्णय घ्या, असे भोये म्हणाल्या.

या प्रसंगी माजी सभापती उत्तम कडू, कॉ. सावळीराम पवार, कॉ. भीमाशंकर पाटील व कॉ. वसंत बागुल हेही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा