Breakingमोठी बातमी : काबुलमध्ये तालिबानी दाखल, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळालेकाबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी पाय ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे. तालिबाऱ्यांनी अफगाणिस्तान मधील आता पर्यत ६५ टक्के क्षेत्रावर ताबा मिळवला असल्याचे सांगितले जात आहे. 


अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली असून अशरफ घनी यांनी देश सोडून ताजिकिस्तानला गेले आहेत. तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल गनी ब्रार दोहाहून काबुलला पोहोचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


तालिबानने ट्रांझिशन फेजची (सत्ता परिवर्तन) मागणी केली आहे. तसेच, काबुलवर ताकदीच्या जोरावर ताबा मिळविण्याची तालिबानची इच्छा नाही. आम्हाला सर्व काही ट्रांझिशन फेजने हवे आहे. तसेच, सत्ता परिवर्तन सहजतेने झाले, तर कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्त हाणी होणार नाही. यावर अफगाणिस्तानचे कार्यवाहक गृहमंत्री अब्दुल सत्तार मिर्झाकवाल म्हणाले, 'काबूलवर हल्ला होणार नाही, सत्ता परिवर्तन शांततेत होईल.' एवढेच नाही, तर काबुलच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा दलांची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त "एपी" या वृत्तसंस्थेने दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा