Breaking
'सबका साथ, सबका विकास' या करीता जनतेने दिलेले आशीर्वादाने मला काम करण्याची प्रेरणा मिळाली - डॉ. भारती पवार


सुरगाणा / दौलत चौधरी सबका साथ, सबका विकास हि खुप मोठी जबाबदारी मोदी साहेबांनी आमच्यावर सोपवली आहे. आता भारत बदलतोय, आपली लस आपणच बनवतोय, सुरगाणा येथे लवकरच उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात येईल. हेच काम करण्यासाठी जनतेने दिलेले आशीर्वादामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सुरगाणा येथील जन आशीर्वाद यात्रा प्रसंगी केले. 


यावेळी व्यासपीठावर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, कलावती चव्हाण, सुनील बच्छाव, एन.डी. गावित, ज्योती जाधव, झोपा थोरात, रमेश थोरात, रंजना लहरे, शामू पवार, कैलास सुर्यवंशी, रामजी गवळी, सचिन महाले, विजय कानडे, जेष्ठ नागरिक रामदास महाले,
आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोना काळात केंद्र सरकारने ऐंशी कोटी जनतेला मोफत रेशन अतिदुर्गम भागातील वाडी, पाडा  वस्तीवर पोहचविले. महिला भगिनींच्या जनधन खात्यात आर्थिक मदत दिली. भाजपच्या कार्यकर्ते यांचेवर जनतेचा विश्वास आहे. आदिवासी क्षेत्रात वनधन योजना, वनउपज, आरोग्य, शिक्षण,पाणी,रस्ते, धरणे हि कामे करण्यासाठी सर्वांची साथ हवी आहे.


आदिवासी भागात दिवंगत दादासाहेब ए.टी. पवार यांनी गेल्या चाळीस वर्षात विकासाची अनेक कामे केली आहेत. सुरगाणा तालुक्याचा सर्वांगिण विकास व्हावा हे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. त्यांची विकासाची तळमळ, जिद्द, चिकाटी, मेहनत महत्वाची होती. तालुक्यात पंधराव्या वित्त आयोगाची चौतीस कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खासदार चव्हाण म्हणाले की, देशात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आठ आदिवासी समाजातील खासदार मंत्री, बारा दलित समाजातील मंत्री, सताविस ओबीसी समाजातील मंत्री यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी खुप जणांना जीव गमावावा लागला. बोगस आदिवासी विरोधात तसेच  धनगरांना आदिवासींमध्ये समावेश करु नये यासाठी डॉ. पवार यांनी संसदेत आवाज उठविला पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

यावेळी कोरोना काळात ऑक्सिजन बेडची लोकवर्गणीतून उभारणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक रतन चौधरी, रामभाऊ थोरात, भगवान थोरात,  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पवार, डॉ. कल्पेश भोये, डॉ. दिपिका महाले, डॉ. योगिता जोपळे, रुग्णवाहिका चालक दिंगबर गावित, हेमराज गावित, परिचारिका यशोदा डोके आशा सेविका पुष्पा परदेशी, भीमा खांडवी, आरती पवार, सफाई कामगार अनिल गायकवाड पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सागर नांद्रे, अनिल बोडके आदिंचा कोरोना योद्धा म्हणून पुष्पगुच्छ,प्रमाणात देऊन सत्कार करण्यात आला. माजी सैनिक शांताराम थोरात, काशिनाथ गायकवाड, पांडुरंग महाले, शिवराम चौधरी, भागवत  जाधव, शांताराम जाधव, गोपाळ गायकवाड, दतू चव्हाण, वीर पत्नी अनुसया भोये,वाघमारे ताई आदींचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने सत्कार करण्यात आला.

यावेळी लक्ष्मण जाधव, भावडू चौधरी, यशवंत देशमुख, मुरलीधर ठाकरे, चंद्रकांत भरसट, सुनील भोये, कैलास वाघेरे, मनोहर जाधव, भाऊराव देशमुख सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा