Breaking
जुन्नर : मोक्काच्या दोन गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेलल्या कुविख्यात दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईलने पाठलाग करुन ठोकल्या बेड्या !


आळेफाटा : गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या मोक्कातील दोन गुन्ह्यातील कुविक्यात दरोडेखोर बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले याला स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडून 'आळकुटी फाटा' येथे सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या असल्याची अधिकृत माहिती स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर, जुन्नर तालुक्यातील मोक्काच्या दोन गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या कुविख्यात दरोडेखोर बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले, हा गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. 


हे पण पहा ! पुणे : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी, भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता !


त्याचेवर आळेफाटा पोलिस स्टेशन येथे गुन्हा र.नं ४३०/२०२० भा.द.वि.कलम ३९५,३९७ तसेच शिरूर पोलिस स्टेशन येथे गु.र.नं ३५६/२०१७ भा.द.वि. कलम ३९५ अन्वये गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यांना मोक्का कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात आली होती. त्यामुळे या गुन्ह्यातील फरार आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या.


हे पण पहा ! जुन्नर : कुकडी पट्ट्यात बिबट्याने केला शेतकऱ्याचा पाठलाग, प्रसंगावधान राखल्याने शेतकरी बचावला


सदर गुन्ह्यांतील  निष्पन्न आरोपी बाळू उर्फ बाळ्या झारु भोसले (वय ४५ वर्ष रा. निघोज, ता पारनेर, जि. अहमदनगर) हा गुन्हा घडल्या पासून फरार होता. तो जंगल व डोंगराळ भागात राहत असल्याने तो सहजा सहजी मिळणे शक्य होत नव्हते. सदर गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपीचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपी ची माहिती घेण्या करीता वेष बदलून त्याचा ठाव ठिकाणा बाबत माहिती घेऊन त्याची माहिती देणारे बातमीदार नेमून त्यांचे मार्फत पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील फरार आरोपी बाळू झारू भोसले हा बेल्हे नजीकच्या अळकुटी फाट्यावर येणार आहे. लागलीच सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून सिनेस्टाईल पटलाग करून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव बाळू उर्फ बाळ्या झारू भोसले (रा.निघोज ता. पारनेर, जि. अहमदनगर )असे सांगितले.


हे जरुर वाचा ! भारताची विक्री थांबवा, जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे आवाहन !


सदर आरोपीवर आळेफाटा पोस्टे गु.र.नं ४३०/२०२० भादवि कलम ३९५,३९७ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम३ (१), तर शिरूर पोस्टे गु.र.नं ६५६/२०१७ भादवि कलम ३९५, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ कलम ३(१) नुसार गुन्हे दाखल आहेत.

 

आरोपीची वैदकीय तपासणी करून पुढील तपासा करीता आळेफाटा पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिला आहे. पुणे जिल्हा ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, पो.ह.हनुमंत पासलकर, दीपक साबळे, विक्रम तापकीर, पो.ना.संदीप वारे, पो.कॉ.अक्षय नवले, निलेश सुपेकर, पो.कॉ.दगडू विरकर यांनी कारवाई केली आहे.


हे पण पहा ! 'पेसा पुरस्कार'साठी राज्यभरातून एकच प्रस्ताव, ५ टक्के अबंध निधिचा गैरवापर होतोय?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा