Breaking


कॉम्रेड तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट च्या वतीने वृक्षारोपण !


कागल : कॉ. तुळशीदास किल्लेदार सामाजिक ट्रस्ट च्या वतीने विश्वात्मके मंडळी चिखली यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी तब्बल 35 वृक्षांची लागवड केली. 


यामध्ये आंबा, चिंच, उंबर व काही जंगली झाडांचा समावेश होता. ट्रस्ट चे सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संदीप घाटगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. यावेळी सामाजिक ट्रस्टचे व विश्वात्मके मंडळीचे 40 कार्यकर्ते उपस्थित होते.


वृक्षारोपनास सामाजिक ट्रस्ट चे अध्यक्ष कॉ. शिवाजी मेथे, सचिव व शिक्षणप्रेमी कॉ. हरिदास पोवार यांच्यासोबत मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक खाडे, लिंगनूर चे सरपंच स्वप्निल कांबळे, माजी सरपंच मयूर आवळेकर, कॉ. विलास भोसले, कॉ. नंदकुमार किल्लेदार, कॉ. डॉ. प्रवीण जाधव, कॉ. नामदेव भोसले, शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. प्रवीण जाधव म्हणाले, महापूर , अवकाळी पाऊस यांसारख्या आपत्तीला आपण कसे जबाबदार आहोत. झाडांची कमी झालेली संख्या यांकडे लक्ष वेधत पृथ्वीच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाची सांगता करत असताना कोणीही कोणाचे आभार व्यक्त करू नये कारण आपले वृक्षलागवड करणे हे कर्तव्य आहे. आपण कोणावर उपकार करत नाही आहोत. हे काम निरंतर चालू ठेवूया असे विश्वात्मके मंडळींच्या सदस्यांनी सांगितले. 
 
वृक्ष लागवडीसाठी फिरोज चौस निपाणी यांनी 55 रोपे लिली, शालेय पोषण आहारच्या शोभा पाटील यांनी आलेल्या सर्वांना अल्पोपहार व चहा स्वखर्चातून दिला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा