Breaking


आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व महादेव कोळी सेवाभावी संघाच्या वतीने आदिवासी दिन साजरा !


अहमदनगर : आदिवासी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था अहमदनगर, महादेव कोळी सेवाभावी संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर शहरात ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डाॅ.प्रा.शर्मिला पारधे- देशमुख यांच्या हस्ते आदिवासी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.प्रसंगी ऑल इंडिया आदिवासी एम्पाॅईज फेडरेशन शाखा अहमदनगर जिल्हाचे अध्यक्ष देवेंद्र बहिरम व सचिव आबाजी भांगरे, मुख्याध्यापक रामचंद्र सुपे, शिवराम सगभोर, संस्था कार्याध्यक्ष शिवानंद भांगरे, सचिव सुरेश शेंगाळ, हिरामण पोपेरे, सुधा धिंदळे, दिक्षा भांगरे आदि मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा