Breakingमहिला अस्मितेचा गैरफायदा घेऊन शिक्षकाला 'छेडछाड प्रकरणात' अडकविणाऱ्या दोन महिला शिक्षिका निलंबित !


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : नारायणगाव शिवारातील धनेगाव (धनगरवाडी, ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक युसूफ आत्तार हे अश्लिल मेसेजेस पाठवीत आहेत. वरून धनगरवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव पाटोळे, पत्नी सविता पटोळे, धनेगावच्या स्थानिक सरपंच मिराताई शेळके यांचे समवेत आलेल्या चार नातेवाईकांसमोर 'अश्लिल मॅसेज' का पाठविता? असे विचारले असता, शिक्षक आत्तार यांनी हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व त्यांचे नातेवाईक मदतीला धावले असता; आत्तार यांनी चारही नातेवाईकांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशी खोटी फिर्याद नारायणगाव शिवारातील दरंदळे, मळा शाळेतील प्राथमिक शिक्षिका 'निर्मला अशोक डुंबरे' आणि आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोणवडी येथील शाळेतील शिक्षिका "दीप्ती महेंद्र गायकवाड" अशी फिर्याद नारायणगाव पोलिस ठाण्यात दाखल केली.


मात्र जिल्हा परिषदेने केलेल्या विभागीय चौकशीत शिक्षक आत्तार हे निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्याने दोन महिला शिक्षकांनी धनगरवाडी येथे येऊन मारहाण करणे व खोटे गुन्हे दाखल करून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले असल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सन २८ डिसेंबर २०१८ रोजी निर्मला अशोक डुंबरे या शिक्षकेने त्यांना धनेगाव (धनगरवाडी) येथील प्राथमिक शिक्षक युसूफ आत्तार हे अश्लिल मेसेजेस पाठवत आहेत.असे सांगून त्यांचे पती व इतर नातेवाईकांना युसूफ आत्तार यांना धनगरवाडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांचे मार्फत फसवून बोलावले. व तंटामुक्ती अध्यक्षांच्या घरात मारहाण केली होती. तसेच त्याच ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव पाटोळे, त्यांची पत्नी सविता पाटोळे, सरपंच मीराताई शेळके व निर्मला डुंबरे यांच्या समवेत आलेल्या त्यांच्या चार नातेवाईकांसमोर अश्लिल मेसेजेस का पाठवता? असे विचारले असता, आत्तार यांनी डुंबरे यांचा हात धरला व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच त्यांचे नातेवाईक मदतीला धावल्यावर आत्तार यांनी चारही नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली,अशी खोटी फिर्याद नारायणगाव पोलिस ठाण्यात दाखल केली. 

दाखल झालेल्या फिर्यादीवरून ४ ऑक्टोबर २०१८ रोजी आत्तार यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी पी.एस. मेमाणे व गटविकास अधिकारी सुधीर भागवत पंचायत समिती जुन्नर यांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता तडकाफडकी निलंबन केले. व आत्तार यांची विभागीय चौकशी सुरू केली. मात्र "खातेनिहाय्य चौकशीत आत्तार यांनी शिक्षिका डुंबरे यांना कोणतेही अश्लिल मेसेज पाठविले नसल्याचे विभागीय चौकशीअंती स्पष्ट झाले. त्याचप्रमाणे धनगरवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव पाटोळे आणि त्यांची पत्नी सविता पाटोळे आणि सरपंच मिराताई शेळके यांचे जबाब चौकशी समितीने ग्राह्य धरून, आत्तार यांचेवर केलेले आरोप,तसेच डुंबरे यांनी दिलेली फिर्याद हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट झाले. 

या उलट आत्तार यांनी कोणतेही असभ्य वर्तन केलेले नसून, आत्तार यांनाच डुंबरे सोबत आलेल्या नातेवाईकांनी मारहाण केली असल्याचे आपल्या जबाबात सांगितले. त्याच प्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्विनी पवार यांनी प्रशासनाला काही प्रश्न विचारून उलट तपासणी केली त्यात पवार यांनी विचारले की, "कोणत्याही महिलेचा विनयभंग तिचा पती आणि ७/८ लोकांच्या उपस्थित कसा होऊ शकतो? तसेच एक व्यक्ती चार लोकांना लाथाबुक्क्यांनी कसे काय मारू शकतो ? याचाच अर्थ असा की संबधित महिलेने "महिला अस्मितेचा गैरफायदा घेऊन आत्तार यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठीच असे खोटे आरोप केल्याचे स्पष्ट झाल्याने त्याचप्रमाणे २८ सप्टेंबर २०१८ रोजी संबधीत शिक्षिका डुंबरे ह्या शालेय वेळेत कोणतीही राजा न नोंदविता कर्तव्यावर असतांना त्यांच्या शाळेपासून सुमारे सात/आठ किलोमीटरवर धनगरवाडी येथे येऊन, मारहाण करणे व खोटे आरोप करून त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्मला अशोक डुंबरे यांना निलंबित केले आहे.

त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्यातही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.गोणवडी जिल्हा परिषद शाळेतील दीप्ती महेंद्र गायकवाड या शिक्षिकेने एकनाथ दामोधर दुशिंग यांचेवर देखील असभ्य वर्तन करून शाळेतील मुलींबरोबरही असभ्य वर्तन करीत असल्याचा गंभीर आरोप दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी केले होता. या प्रकरणी घोडेगाव पोलिस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती. त्यामुळे दुशिंग यांनाही २६ डिसेंबर २०१८ रोजी निलंबित करण्यात आले होते.त्यांचीही विभागीय चौकशी करण्यात आली होती.

विभागीय चौकशीत "सात आठ मुलींनी सांगितले की गायकवाड मॅडम यांनी आम्हाला दमदाटी करून दुशिंग सरांच्या विरोधात बोलायला भाग पाडले, मात्र दुशिंग सरांनी कोणतेही गैरवर्तन केलेले नाही. असा जबाब मुलींनीच दिल्याने व विभागीय चौकशीत दुशिंग हे निर्दोष असल्याचे स्पष्ट झाल्याने दीप्ती महेंद्र गायकवाड यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे.

महिला असल्याचा व महिला अस्मितेचा गैरफायदा घेणाऱ्या महिलांना योग्य ते शासन व्हावे म्हणून संबंधित महिलांना निलंबित करण्यात आले असल्याचे समजते. याबाबत आत्तार यांचेशी झंझावात प्रतिनिधीने संपर्क साधला असता, केलेल्या कारवाई बाबत समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धनगरवाडी येथील नागरिकांनी सत्याच्या बाजूने उभे राहून सहकार्य केले त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन आणि जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीचे आत्तार यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा