Breaking


नारायणगाव : चालकाशिवाय धावली बुलेट, पुणे नाशिक महामार्गावरी थरारक व्हिडीओ व्हायरल !


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : नारायणगाव शहरातील पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बुलेटची रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमाला जोरात धडक बसल्याने पादचारी गंभीर जखमी झाला. धडक इतकी जोरात होती की, बुलेटस्वार अक्षरशः खाली कोसळला, विशेष म्हणजे अपघातानंतर महामार्गावरून बुलेट सुसाट वेगाने चलकांविना धावली, हा थरार प्रत्यक्ष जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही. ही घटना सोमवार दि.९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास "परेरा पेट्रोल पंपा" नजीक घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, नारायणगाव येथील तलवार नामक भंगार व्यवसाय करणारे सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावरून बुलेटवर भरधाव वेगात जात होते. त्याच वेळी रस्त्याने जनार्धन दत्तू गांजवे (वय ४७) रा. गांजवेवाडी, ता.जुन्नर यांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बुलेटची धडक बसली. यावेळी चालक तलवार बुलेटवरून अक्षरशः खाली पडला. मात्र बुलेट चलकाशिवाय महामार्गावरून तशीच सरळ पुढे गेली, त्यानंतर एका पिकअप'ला आडवी जाऊन रस्त्याच्या कडेला खाली पडली. ही घटना परेरा पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली. या अपघातात जनार्धन दत्तू गांजवे गंभीर जखमी झाले असून, अपघातग्रस्त गांजवे यांचेवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.हनुमंत भोसले यांनी दिली.


या अज्ञात अपघाताची माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा