Breaking


पेसा व वनहक्क कायद्याचा गावोगावी जागर ; किसान सभा,आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व एस.एफ.आय संघटनेचा पुढाकार
घोडेगाव,(दि.१२) : जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभर आणि देशभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. किसान सभा,आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व एस.एफ.आय.या संघटनांच्या व ग्रामस्थांच्या समनव्यातुन आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे २५ गावं व वाडी- वस्तीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.


यावेळी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा,राघोजी भांगरे यांना अभिवादन करून आजच्या आदिवासी वास्तवाला भिडण्याचा प्रयत्न केला जात होता. या सर्व ठिकाणी, उपस्थित नागरिक यांना आदिवासी वनहक्क कायदा व पेसा कायदा यांची संक्षिप्त माहिती सांगून या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले.

                              

याचबरोबर सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम करणेसाठी आणि या आरोग्यव्यवस्थेत जनतेचा सकारात्मक हस्तक्षेप वाढवण्यासाठी नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय रहावी व कोविड चा सामना करताना काय काळजी घ्यावी,  याविषयी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या साथी संस्थेचे भाऊसाहेब आहेर व श्रीपाद कोंडे यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कोविडच्या पार्श्वभूमीवर हे सर्व कार्यक्रम छोटेखानी व वाडी-वस्तीवर घेण्यात आले. यावेळी नागरिकांशी संवाद साधत असताना आदिवासी प्रश्नांचे आजचे वास्तव व त्या सोडवणुकीचा लोकशाही मार्ग यावर ही चर्चा झाली. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने,समाजामध्ये कायदेविषयक चर्चा  घडून आली याविषयी नागरिकांनी ही समाधान व्यक्त केले.

                                   

या जाणीव जागृती अभियानाचे संयोजन किसान सभेचे अशोक पेकारी,राजू घोडे,दत्ता गिरंगे,नंदा मोरमारे, दिलीप काठे,एस.एफ.आय.संघटनेचे अविनाश गवारी,रुपाली खमसे,समीर गारे,महेश गाडेकर, दीपक वाळकोळी यांनी तर आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे अशोक जोशी,विजय उगले,अर्जुन काळे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा