Breaking


ब्रेकिंग : कुस्तीपटू बजरंग पुनियाची जबरदस्त कामगिरी, भारताला मिळाले सहावे पदक


टोकियो : टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताचा पैलवान बजरंग पुनिया याने कुस्ती खेळप्रकारात 65 किलो वजनी गटात ब्रांझ पदक पटकावण्याची दमदार कामगिरी केली आहे. कझाकस्तानच्या पैलवानवर बजरंग पुनियाने मात केली आहे. 


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला हे सहावे पदक मिळाले आहे. ब्रांझ पदकासाठी झालेल्या सामन्यात बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान नियाझबेकोव्हवर वर ८-० ने मात केली आहे. आपल्या खेळात कोणतीही चूक होऊ न देता पुनियाने एकतर्फी विजयश्री प्राप्त केली.


भारताच्या खात्यात आतापर्यंत पाच पदकं असून, पुनियामार्फत भारताला मिळालेलं हे सहावं पदक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा