Breaking
अकोलेतील अत्याचार पिडीत युवती न्यायाच्या प्रतिक्षेत, खटला फास्टट्रैक कोर्टात चालवावा : डॉलीताई डगळे


भारतीय ट्रायबल पार्टी ची मुख्यमंत्र्यांकडे मागणीअकोले : अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यातील स्थानिक आदिवासी युवतीवर झालेल्या अत्याचार संदर्भात पिडीत युवतीने भारतीय ट्रायबल पार्टी च्या आदिवासी महिला आघाडी कडे रितसर आपली लेखी तक्रार दाखल करत न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे यासाठी अर्ज केला आहे. या अनुषंगाने आज दिंनाक 23 सप्टेंबर रोजी भारतीय ट्रायबल पार्टी ने पिडीत युवतीला सोबत घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन तहसीलदार कार्यालय अकोले यांच्या मार्फत देण्यात आले.


या मध्ये पिडीतीने आपल्या वर होत आसेल्या अन्यायाबदल वांरवार पोलीस स्टेशनला व कोर्टात चकरा मारून माझा वेळ व पैशा वाया जात आहे. पिडीत युवतीने आरोपी युवक हा अकोले तालुक्यातील कोंहडी गावचा रहिवासी असून नामे किरण दिघे रा.कोंहडी हा राजूर जवळील रहिवासी आहे. सध्या हा तरूण  सैन्यदलात कार्यरत आहे. 

आरोपी मुलाने पिडिते सोबत सोशल मिडीया वर ओळख करून मैत्री केली व नंतर मैत्रीची ओळख वाढवून पिडीत मुलीच्या घरच्या सोबत ओळख केली व विश्वास संपादन केले. तसेच मुलीच्या घरच्यांना व मुलीला लग्नाचे खोटे नाटे आश्वासन देत मुलीला विश्वासात घेतले.


अहमदनगर जिल्हातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी घेऊन जाऊन हॉटेलमध्ये  शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच कालांतराने संबंधित पिडीत युवतीने तरूणाकडे लग्नासाठी तगादा लावला असता आरोपी तरूणाने अचानक आपला निर्णय बदलला, व लग्नास मुलीस व तिच्या घरच्यांना साफ नकार दिला.

युवतीने आपली फसवणूक होत असल्याचे समजताच अकोले पोलीस ठाणे या ठिकाणी संबंधित युवकाविरोधात रितसर गुन्हा दाखल केला. आरोपी मुलास अटक देखील झाली, सध्या तो जामीनावर बाहेर आहे. तसेच त्याने दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न केली.

आरोपी तरूण हा कोर्टाच्या तारखांना देखिल वेळेवर हजर राहत नाही. परिणामी पिडीत युवतीला योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार मुलीने भारतीय ट्रायबल पार्टी अकोले तालुका कडे लेखी स्वरूपात करून आपल्या ला मदत व सहकार्य करावे अशा स्वरूपात केली आहे. पिडीत युवतीने आपल्याला न्याय मिळण्यास खूपच दिरगांई होत आसल्याने न्याय व्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा