Breaking


जुन्नर : रमाई घरकुल योजनेचा निधी वाढविण्याची युगप्रवर्तक प्रतिष्ठानची मागणी


जुन्नर / आनंद कांबळे : रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात २.५० लक्ष रुपया पर्यंत वाढ करावी अशी मागणी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे केली आहे.


राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचवावे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागात लाभार्थ्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या ठिकाणी पक्के घर बांधून देणेसाठी शासनाने अनु जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना सुरू केली आहे.

या योजनेतील घरकुल हे २६९ चौ. मी. जागेवर बांधकाम करून घेणे साठी शासनाकडून १लाख २०हजार अनुदान दिले जाते सदरची अनुदानाची रक्कम अत्यंत  तुटपुंजी असून सर्वसाधारण २६९ चौ मी घरकुल बांधनेसाठी कमीत कमी ४ ब्रास वाळू,५००० पक्क्या विटा १५० सिमेंट गोणी २० पत्रे, २ चौकटी २ दरवाजे,६ खिडक्या १ शौचालय युनिट,लाईट फिटिंग वाहतूक खर्च असा आताच्या महागाईच्या  दृष्टीने खर्च येतो हा सर्व खर्च आणि या वस्तूंच्या किमती पहाता १.२० लक्ष रुपयात घरकुल होऊ शकत नाही.

वरील सर्व बाबी लक्षात घेता २६९ चौ मीटर घरकुल बनविणेसाठी जवळ जवळ २.५० ते ३ लक्ष खर्च येतो त्यामुळे रमाई घरकुल अनुदानात वाढ करून लाभार्थ्यांना दिलासा द्यावा तसेच राज्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागात रहाणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांना सर्व साहित्य घरकुल बांधनेच्या ठिकाणी कमीत कमी ५० ते६० कि. मी. अंतरावरून वाहतूक करून न्यावे लागते यामुळे मिळणाऱ्या अनुदानात लाभार्थ्यांचे घरकुल होत नाही त्या डोंगराळ भागातील लाभार्थ्यांना वाहतुकीचा खर्च देऊन रमाई घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा