Breakingस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिखलीमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा


चिखली : चिखली प्रभाग क्र.२ मध्ये सार्वजनिक वाचनालय व जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन सोहळा रिव्हर सोसायटी मोशी येथे पार पडला. विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव, युवा नेते संतोष जाधव यांच्या संकल्पनेतून महापौर माई ढोरे (पिं.चि.महानगर पालिका) यांच्यासह नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेविका साधना मळेकर, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.


माजी महापौर विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांचे हस्ते साईजीवन मनपा शाळा, अभिनव इंग्लिश मीडियम स्कुल, ज्ञानाई शिक्षण संस्था, इंद्रधनू सोसायटी, सुभाष मित्र मंडळ, संकेश्वर ड्रीम, ऐश्वर्याम हमारा, मिलेनियम प्यारामाउंट, साईवास्तु, अक्षा, अक्षा वृंदावन, सिल्वर म्हाडा, पेठ क्र.१६ राजे शिवजीनगर येथे भाजी मंडई, विठ्ठल रखुमाई एकटा नागरिक संघ या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.


घरकुलमध्ये स्वातंत्र्य दिनी मोफत आरोग्य शिबिर संपन्न 


७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने घरकुल मधील आनंदी गृहरचना सोसायटीमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरासाठी प्रशांत बहीर, सारीका मुंडे यांच्या प्रयत्नातुन डाॅ.राजश्री बिराजदार, डॉ.शितल घारे यांनी ८० नागरिकांची आरोग्य चिकित्सा केली. प्रवीण बहीर, अक्षय बर्गे, अशोक मगर यांनी या शिबिराचे संयोजन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा