Breakingजुन्नर : ओतूर विकास सोसायटीची 72 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


ओतूर / प्रमोद पानसरे : ओतूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.


सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तुषार शिवाजी थोरात होते. सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संचालक मंडळ व सचिव ईश्वर हांडे यांनी समर्पक उत्तरे दिली आहेत.


चर्चेमध्ये जेष्ठ सभासद उल्हास तांबे, दशरथ डुंबरे, रामदास ढमाले, निवृत्ती तांबे, डी.एम.मोरे आदी सभासदांनी भाग घेतला. तसेच संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संचालक मंडळाचे कौतुक केले. 

संस्थेचे जेष्ठ संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे यांनी प्रास्ताविक केले. देवीदास तांबे यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्षीय भाषणात चेअरमन तुषार थोरात यांनी संस्थेच्या भावी योजनांबाबत माहिती दिली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा