Breaking


अंबाजोगाई : डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या साथ रोगांना आळा बसण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी


अंबाजोगाई : सध्या अंबाजोगाई शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाची साथ मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे. सदर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या आजारांमुळे आतापर्यंत शेकडो रुग्णांना उपचारापाई हजारो रुपये खर्च करावे लागले आहेत. शहरात कोरोना पेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने नगरपालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधीनी त्वरित उपाय योजना आखाव्यात अशी मागणी डीवायएफआयने केली आहे.


प्रमख मागण्या:-

1) शहरातील नाली, खड्डे याबरोबरच शहरभर घरोघरी लिक्विड फवारणी करावी.

2) शहरामध्ये जिथे खड्डे पडले आहेत, त्यामुळे डबके साचले आहे ते सर्व खड्डे बुजावीत.

3) कचरा गाडी वेळी-अवेळी येते त्यामध्ये सातत्य आणावे.

4) आठवड्यातून किमान दोनदा पाणीपुरवठा करावा.


या निवेदनावर सुहास चंदनशिव, देविदास जाधव, प्रशांत मस्के, कृष्णा आगाव, जगन्नाथ पाटोळे आदींचे नावे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा