Breaking


आंबेगाव : ठाकर समाजातील बांधवांना जातीचे दाखले वाटप


आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजाचे काही मूलभूत प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. आदिवासी ठाकर समाजात कोविड-19 चे लसीकरण व्हावे याविषयी मागील काही महिन्यात, आदीम संस्थेने आंबेगाव तालुक्यातील ठाकरवस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण विषयक जाणीवजागृती केली होती.


यावेळी ठाकर समाजाचे अनेक मूलभूत प्रश्न समोर आले होते, यातील एक महत्वाचा प्रश्न होता की, अनेक लोकांकडे जातीचे दाखले नसल्याने मुलांना शिक्षणासाठी अडचण निर्माण होत होती. या समस्येच्या अनुषंगाने आदीम संस्था व किसान सभा आंबेगाव तालुका समितीने, अभिनव महा ई सेवा केंद्र यांच्या मदतीने तालुक्यातील सुमारे 100 ठाकर समाजातील व्यक्तींना जातीचे दाखले मिळवण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करून प्रशासनाकडे ही कागदपत्रे दिली होती. यासाठी तहसील कार्यालय आंबेगाव व उपविभागीय कार्यालय, मंचर हे सर्वतोपरी सहकार्य करत असल्याची माहिती किसान सभेचे अमोल वाघमारे यांनी दिली. 


नुकतेच या १०० व्यक्तींमधील १८ व्यक्तींचे जातीचे दाखले पहिल्या टप्प्यात वितरणाचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी या उपक्रमाचे स्वागत करून या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले.


यावेळी उपविभागीय अधिकारी कोडोलकर यांच्या हस्ते महा ई सेवा केंद्राचे नितेश काळे व हे दाखले काढण्यासाठी, मेहनत घेणारे, किसान सभेचे कार्यकर्ते अर्जुन काळे, या दोघांचाही संविधानाच्या प्रास्ताविकची एक प्रत देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार लता वाजे उपस्थित होत्या.


तसेच, यावेळी किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, राजू घोडे, अविनाश गवारी, अर्जुन काळे, शशिकांत पारधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा