Breaking



प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !


मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'महाकृषी ऊर्जा अभियान' अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम - ब योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.


प्रधानमंत्री कुसुम - ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर कृषीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.


पीएम कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा ? सौर पंप मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा ?

केंद्र सरकारनं देशातील शेतकऱ्यांसाठी सौर पंप आणि ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय उर्जा संयत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान उर्जा व उत्थान महा अभियान म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरु केली आहे. पीएम कुसुम योजनेमध्ये 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमतेचे सौर पंप स्थापित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात जवळपास 1 लाख सौर पंप स्थापित करण्यास केंद्र शासनानं मान्यता दिली आहे. 

पीएम - कुसुम योजनेतून सौर पंप घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा ? 

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर आणि इतर नूतनीकरणक्षम क्षमता जोडण्याचं उद्दीष्ठ आहे. महाराष्ट्रात पीएम कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वरील वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी शेतकऱ्यांकडे आधारकार्ड, जमिनीचा उतारा, पाण्याचा स्त्रोत, बँक खाते पासबूक झेरॉक्स लागणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी 10 टक्के खर्च करावा लागेल. एससी आणि एसटीच्या शेतकऱ्यांसाठी 5 टक्के खर्च करणं आवश्यक आहे. जलसंपदा विभाग, किंवा जलसंधारण विभागाचं पाणी उपलब्धतेबद्दलचं प्रमाणपत्र आवश्यक आहे.


कुसुम योजनेची वैशिष्ट्ये  :

1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. 

2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.

3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील. 

4. सौर उर्जा प्लॉट पडीक जमीनवर लावता येईल. 

ग्रीड बनवून कंपनीला वीज देऊ शकाल ! 

कुसुम योजनेद्वारे शेतकरी त्यांच्या जमिनीवर सोलर पॅनेल लावू शकतात. याद्वारे निर्माण होणाऱ्या वीजेचा वापर करुन शेतीला पाणी दिले जाऊ शकते. शेतकरी सोलर पॅनेल द्वारे तयार झालेली वीज गावातही वापरू शकतात. यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल आणि अतिरिक्त वीज तयार झाल्यास तिचे ग्रीड बनवून ती वीज कंपन्यांना दिल्यास त्यांचा फायदा होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा