Breaking


त्रिपुरात माकपसह पाच मीडिया चॅनेलच्या कार्यालयावर हल्ला


त्रिपुरा : अगरतला येथे बुधवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास पाच मीडिया हाऊस आणि माकप पक्षाच्या दोन कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप माकपने केला आहे. या हल्ल्यात काही पत्रकार जखमी झाले आहे.


हे वाचा ! आशांच्या पदरी वेठबिगारीच, राज्य सरकारच्या फक्त घोषणा ! आशा व गटप्रवर्तकांमध्ये तीव्र संताप


बुधवारी संध्याकाळी भाजपने एक रॅली काढली होती, या रॅलीचे नेतृत्व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव भट्टाचार्य आणि दोन सचिव टिंकू रॉय आणि पापीया दत्ता यांनी केले होते. त्यावेळी भाजप कार्यकत्यानी PB 24, प्रतिबाडी कलाम, कलमर शक्ति, दैनिक देशरकाथा, दुरंत टीवी या पाच मीडिया हाऊसवर हल्ला केल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. या हल्ल्यावेळी महत्वाचे कागदपत्रे, हार्डडिस्क जबरदस्तीने घेतल्याचा आरोप “प्रतिबाड़ी कलाम” चे संपादक अनल रॉय चौधरी यांनी केला आहे.


हे पहा ! दोन बोटी धडकून भीषण दुर्घटना, 70 जण बेपत्ता


लावलेल्या या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली आहे. त्यामध्ये संपादक अनल रॉय चौधरी यांचे वाहनही जळून खाक झाले आहे. मीडिया संस्थानांनी या घटनेचा निषेध करत गुंडांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.


जाणून घ्या ! केळी खाण्याचे फायदे व तोटे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा