Breakingबीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रास्ता रोको आंदोलन


परळी / अशोक शेरकर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बंद पाळण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग 361 फ वरील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबा आंबेडकर चौकात चक्काजाम करण्यात आला. यावेळी संयुक्त किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी उपस्थिती जन समुदायास संबोधीत केले.


केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी मागील दहा महिन्या पासुन दिल्लीच्या सहा सिमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. आत्ता पर्यंत सहाशे पेक्षा जास्त आंदोलक शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. तरीही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करीत नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने सोमवारी दि. २७ भारत बंद ची हाक दिली होती.


महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ. अजय बुरांडे यांच्या  सह संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाहतूक खोळंबली

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 फ वरील सिरसाळा येथील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात रास्ता रोको करण्यात आल्याने बीड व परळीकडे वाहतूक करणारे अनेक वाहने अडकून पडली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा