Breakingभारत पवार यांना इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड 2021 च्या पुरस्काराने केले सन्मानित


कळवण (सुशिल कुवर) : निर्वाण फाऊंडेशन सामाजिक संस्थेकडून शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांसाठी दिला जाणारा 2021 चा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय आयडॉल पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारत पवार यांना प्रदान करण्यात आला.


भारत पवार यांनी इंटरनॅशनल आयडॉल अवार्ड व तसेच ऑडियन्स मधून संपूर्ण भारतातून सर्वाधिक पसंती मिळवून हा ऑडियन्स चॉईस अवॉर्ड कलाशिक्षक व चित्रकार भारत पवार देवळा एज्युकेशन सोसायटी, यांना नाशिक येथील आदित्यहॉल मध्ये दिमाखदार सोहळ्यात मिस इंडिया इंटरनॅशनल युनिवर्स क्विन शिल्पी अवस्थी, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समवेत आफ्रिकन स्काॕलर सोशल अँक्टीव्हिटि संनासी बायडम, निर्वाण फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर, सामाजिक कार्यकर्त्या आरती हिरे, विमल बोधरे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


या निमित्ताने देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, सचिव गंगाधर शिरसाठ, उपप्राचार्या डॉ. मालतीआहेर, माध्यमिक शिक्षणाधिकारी नाशिक पुष्पावती पाटील, गटशिक्षणाधिकारी, देवळा सतीश बच्छाव, केंद्रप्रमुख रावबा मोरे, मुख्याध्यापिका प्रतिभा सागर, मुख्याध्यापक डी. ई. आहेर, पर्यवेक्षक ठोके सर्व शिक्षक -शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या वतीने भारत पवार यांचे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा