Breakingमोठी बातमी : विराट कोहली 'कर्णधारपद' सोडणार


मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी संध्याकाळी मोठी घोषणा केली. विराटने ट्विटरवरुन कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून विराट कर्णधारपद सोडणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, मात्र आता या चर्चेला पूर्ण विराम मिळाले आहे.


ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी - 20 सामन्यानंतर विराट कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा विराटने ट्विटद्वारे केली आहे.त्यामुळे विराटनंतर आता टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण होणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, विराटच्या या निर्णयामुळे टीम इंडियाचा नवा कर्णधार रोहित शर्मा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा